बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बेधडक वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाना पटोले यांच्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि सेना, राष्ट्रवादीत यांच्या खटके पडत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी काल मध्यस्थी केल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर देखील नाना पटोले यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे, याबद्दल मला कल्पना नाही, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आयबीचा, पोलिसांचा रिपोर्ट रोजच्या रोज सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर नेऊन दिला जात आहे. आताही मी कुठे आहे, राज्यात कुठे कुठे काय सुरु आहे, कुठे आंदोलन होत आहे याची माहिती त्यांना पोहोचवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेसला मानणारा एक मोठा पक्ष आहे. काँग्रेस संपली असा खोटानाटा आरोप भाजप करतं पण वस्तुस्थिती तशी नाही. आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. येत्या 2024 ला काँग्रेस जास्त जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

शनाया कपूरचा हॉट अंदाज; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे- रामदास आठवले

‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने सुनिल शेट्टींची इमारत सील!

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More