उद्धव ठाकरे-चंद्राबाबूंमध्ये चर्चा? भाजपची डोकेदुखी वाढली

उद्धव ठाकरे-चंद्राबाबूंमध्ये चर्चा? भाजपची डोकेदुखी वाढली

मुंबई | भाजपवर नाराज असलेल्या उद्धव ठाकरे आणि तेलगु देसमचे सर्वेसर्वा तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेने नुकतीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनीही एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिलेत. 

चंद्राबाबूंनी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू यांच्यात काय चर्चा झाली ते अद्याप समजू शकलेलं नाही. 

Google+ Linkedin