शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक

अहमदनगर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचं कळतंय. शिवसेनेच्या दोन गटांमध्ये असलेल्या वादातून ही दगडफेक करण्यात आली असून यामध्ये काही शिवसैनिकांची डोकी फुटली आहेत. 

शिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्याला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी औटींचे विरोधक आणि पारनेर तालुकाप्रमुख निलेश लंके गटानं उद्धव  ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. 

दरम्यान, शिवसेनेनं मात्र असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं म्हटलंय. एकाने अतिघाईत माजी आमदार अनिल राठोड यांच्या अंगावर चुकून गाडी घातली. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्या गाडीची काच तुटली, असं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आलंय.