मुंबई | ठाकरे सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिवसेनेकडून अनेक ज्येष्ठांना डावलण्यात आल्याने पक्षात खदखद आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार तानाजी सावंत यांच्यात खटके उडाल्याची माहिती आहे. या संदर्भातली माहिती ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीनं दिली आहे.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सावंतानी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डावलण्यात आल्याचं कारण विचारलं. ठाकरेंच्या उत्तराने समाधानी न झाल्याने सावंतांनी पुन्हा कधीही मंत्रिपदासाठी मातोश्रीवर येणार नाही, असं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत निरोप दिल्याचं वृत्त आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तानाजी सावंत मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. असे असताना त्यांना उमेदवारी डावलण्यात आली. ते जलसंधारण मंत्री असताना त्यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्त राहिली. त्यामुळेच शिवसेनेनं त्यांना डावलल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सावंत याच्या काळात तिवरे धरण फुटले होते. त्यावेळी खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटले अशी अजब प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यामुळे शिवसेनेवर मोठी टीका झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनेच्या वागण्यामुळे बाळासाहेबांना स्वर्गात खूप वाईट वाटत असेल”- https://t.co/awFNGVpcw4 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
चांद्रयान-3 ला केंद्र सरकारची मंजुरी; इस्रो प्रमुख के. सिवन यांची माहिती https://t.co/gCjZZfktN8 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
माझी निष्ठा कुठं कमी पडली?; मंत्रिपद न दिल्यानं शिवसेना आमदाराचा सवाल – https://t.co/DfqHUSGUcx @_BhaskarJadhav @OfficeofUT @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.