बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींचं पॅकेज जाहीर

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी 6 हजार 800 रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी 10 हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी 18 हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार 25 हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीये.

दरम्यान, राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

‘भारत विषारी वायू सोडणारा देश’; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

“एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल”

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More