बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”

मुंबई | दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या, असा टोला उद्धव ठाकरेंनी महिंद्रांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

काही उद्योगपती म्हणतात की आरोग्य यंत्रणा वाढवण्यासाठी भर द्या. हॉस्पिटल उभारा. मात्र, नुसते फर्निचर उभे करून काय उपयोग? त्यासाठी डॉक्टर नकोत का? काही उद्योगपती हा सल्ला देत आहेत. त्यांना मी सांगतो, तुम्ही 50 डॉक्टर द्या, आपण तेही करू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आनंद महिंद्रांचं नाव न घेता त्यांनी खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, उद्धवजी, समस्या अशी आहे की लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालये, आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होते. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया आणि मृत्यू टाळूया, असा सल्ला आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-  

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं!

‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More