बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरू म्हणणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून आज जनतेशी संवाद साधला आहे. या संवादात त्यांनी विरोधकांवर चांगलीच टीकेची झोड उठवल्याचं दिसून आलं. विरोधी पक्षाने लाॅकडाऊनला कडाडून विरोध केला होता.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

‘विरोधकांनी रस्त्यावर उतराच, पण ते आरोग्यकर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर यांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला केलं आहे. तसेच विरोधी पक्षांनी केलेल्या टीकांचे वाचन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच जीवाशी खेळ नको आणि अशा परिस्थितीत राजकारण नको असं म्हणत त्यांनी विरोधकांना झापलं आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास तरी लाॅकडाऊन जाहीर केला नसला तरी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या दोन दिवसात तज्ञांशी चर्चा करून निर्बंधासंदर्भात काय निर्णय घेता येईल आणि त्याचा जनतेला आर्थिक फटका बसणार नाही या दृष्टीने पावलं उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेची संवाद ; वाचा संवादातील मुद्दे

अन् चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ

“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”

आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता

कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More