मुंबई | महाराष्ट्रातील 11 कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात लक्षणे आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना कोरोनासंबंधी सद्यस्थितीची माहिती दिली.
राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये. त्यासाठी त्यांनी अधिकची खबरदारी घ्यावी. चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल, असं ते म्हणाले.
ट्रेंडींग बातम्या-
ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट
सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एंट्री; केली मोठी घोषणा
महत्वाच्या बातम्या-
शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवरच महाराष्ट्र आणखीही उभा आहे; राज ठाकरेंचं खास ट्वीट
दिल्ली हिंसाचारात हिंदू , मुस्लीमाचं नाहीतर माणुसकीचं रक्त वाहिलं- अमोल कोल्हे
“रावसाहेब दानवेंच्या सांगण्यावरूनच हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा”
Comments are closed.