मुंबई | ज्या लोकांच्या हातावर होम कॉरंनटाईनचा शिक्का मारला आहे त्या लोकांनी कृपया घरी बसावं. होम कॉरंनटाईनचा शिक्का असलेल्यांनी घरात वेगळं बसावं. कुटुंबियांच्या संपर्कात येऊ नये. आता हा रोग गुणाकार धारण करेल मात्र आपल्याला आता रोगाची वजाबाकी करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Cm Uddhav thackeray Appeal maharashtra over Corona)
परदेशातून उद्यापासून कोणतंही फ्लाईट येणार आहे. आता फक्त आपलं आपण आहोत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या रोगावर मात करायची आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेले आदेश पाळा. जनता कर्फ्यू आज रात्री संपणार नाही तर तो उद्यापर्यंत असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
रेल्वे आणि मुंबई लोकलपाठोपाठ आता राज्यातली एसटी सेवादेखील बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसंच शहरातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काही बस सुरू राहतील, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उद्यापासून 144 लागू असणार आहे. म्हणून 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. सोशल डिस्टसिंग पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अभिनेत्री पूजा बेदीने खिल्ली ‘जनता कर्फ्यू’ची उडवली खिल्ली; म्हणाली…
‘जनता कर्फ्यू’चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत
महत्वाच्या बातम्या-
मी घरातूनच काम केलं, तुम्हीही करा- प्रमोद सावंत
रेल्वे आणि लोकल पाठोपाठ एसटी देखील बंद राहणार?
काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठींबा; म्हणाले…
Comments are closed.