मुंबई | कोरोनाच्या भयाण संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने राज्यातील जनतेला संबोधित करत आहेत. बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? काय उपाययोजना करायच्या आहेत? तसंच कोरोनाची सद्यपरिस्थिती ते नागरिकांपुढे मांडत असतात. आज महाराष्ट्राला संबोधित करताना त्यांनी सुरूवातीलाच मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेचे धन्यवाद द्यायला आलोय, असं म्हटलं.
राज्यातील जनता उत्तम सहकार्य करत आहेत. हे संकट परतवून लावेपर्यंत त्यांनी असंच सहकार्य करावं, अशी अपेक्षा त्यांनी राज्यातील जनतेकडून केली. तसंच पोलिसांना देखील नागरिकांना सहकार्य करावं, असं ते म्हणाले आहेत.
केंद्र सरकारचे देखील उद्धव ठाकरे यांनी आभार मानले तसंच त्यांनाही धन्यवाद दिले. देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात यावी तसंच 31 मार्च रोजीची परताव्याची मुदत वाढवावी, अशा दोन विनंती आपण केंद्राला केल्या होत्या या दोन्ही विनंती केंद्राने मान्य केल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसंच त्यांना धन्यवाद देतो, असं ते म्हणाले.
दुसरीकडे काही विक्रेत्यांनी लाखो मास्कचा साठेबाजार केला होता. पोलिसांनी धाड टाकत ते सगळे मास्क जप्त केले. याबद्दल त्यांनी पोलिसांचं कौतुक केलं आणि आभार मानले. तसंच अशाच कामाची त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचं सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं
कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी
महाराष्ट्रातले 15 कोरोना पेशंट ठणठणीत बरे झाले आहेत; आरोग्य यंत्रणेला मोठं यश
Comments are closed.