बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जवळपास 28 हजार रुग्ण बरे झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होतं”

मुंबई |  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही बाबींमध्ये सरकारने शिथीलता आणली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

जवळपास 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झालेत, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून मला दु:ख होतं, अशा शब्दात त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राला बदनाम करण्याच कारस्थान सुरू आहे.  महाराष्ट्रात भयावह स्थिती नाहीये.  दुर्दैवानं आपलीच लोकं कारस्थान करतात, असं टोमणा त्यांनी विरोधी पक्षाला मारला.

महाराष्ट्रात कोरोनाचे 65 हजार रूग्ण जरी झाले असले तरी कोरोनाचे ऍक्टिव्ह रूग्ण 34 हजारांवर आले आहेत. 28 हजार रूग्ण आतापर्यंत घरी गेले आहेत तर 1 हजार 200 कोरोना रूग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यातील 200 कोरोनाबाधित रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘मिशन बिगीन अगेन म्हणजे पुनश्च हरीओम’ असा नारा देत लॉकडाऊन हे विज्ञान असेल, तर ते उघडणं ही कला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हळूहळू आपण आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरूवात करतोय. इथून पुढच्या काळामध्ये शासन आणि जनतेने हातात हात घालून चाललं पाहिजे. इतर देशांचा अनुभव पाहून निर्णय घेतोय. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करतोय. 3 जूनपासून हातपाय हलवायला सुरूवात करू, असं ते म्हणाले.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More