मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौरा करणार आहेत. महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने ते प्रभुरामाचं दर्शन घेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेही अयोध्येत दाखल होणार आहेत.
शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा होत आहे. शिवाय यावेळी काँग्रेस नेतेही हजर राहणार असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे.
राम हा सगळ्यांचा असून भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकतेच प्रतिक आहे. त्यामुळे अयोध्येत येऊन प्रभूरामाचं दर्शन घेण्यात काही गैर नाही, असं सुनील केदार म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा गाजण्याची शक्यता आहे. कारण अयोध्येतील साधू-संतांनी त्यांना विरोध केला आहे. शिवसेनेनं हिंदूत्वाला मुठमाती दिली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्रिपद सांभाळणं उद्धव ठाकरेंचं काम नाही; चंद्रकांत पाटलांची विखारी टीका
“मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्हाला विरोधकांसारखा आकड्यांचा खेळ जमत नाही”
महत्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं”
पोरीनं आई-बापाचं पांग फेडलं; पहिल्याच प्रयत्नात बनली पीएसआय!
राहुल गांधींनी कोरोनाची तपासणी केली; काँग्रेसचं भाजपला उत्तर
Comments are closed.