Loading...

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे म्हणतात…

नाशिक | भुजबळ कुटुंबियांनी शिवसेनेशी अथवा माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही. छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार नाही, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नाशिक आणि दिंडोरी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांचा शिवसेना प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी स्वत: उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर भुजबळांचा प्रवेश होणार नसल्याचं सांगितलं.

Loading...

छगन भुजबळांनी देखील याच आठवड्यात मी राष्ट्रवादी सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, असं स्पष्ट केलं होतं.

दरम्यान,  उद्धव ठाकरेंनीच भुजबळ शिवसेनेच्या संपर्कात नाहीत, असं स्पष्ट केल्याने राष्ट्रवादी मोठा धक्का बसण्यापासून वाचली आहे. सध्याचा काळ पाहता राष्ट्रवादीला दिलासा देणारी बातमी आहे, असं म्हणावं लागेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीला पुढील 15 वर्षे सत्ता मिळणार नाही- चंद्रकांत पाटील

-…म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस दिसणार ‘या’ दिवशी एकाच मंचावर!

-भाजपात जाणाऱ्या पिचडांविरोधात मतदारसंघातली जनता ‘या’ कारणामुळे आक्रमक!

Loading...

-पवारांची साथ सोडताना अन् भाजप प्रवेश करताना शिवेंद्रराजेेे म्हणतात…

-अमित ठाकरेंचा दणका; ‘हा’ निर्णय घ्यायला रेल्वे प्रशासनाला पाडलं भाग!

Loading...