बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठे गोष्टी सांगत नाहीत तर ते इतिहास रचतात- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राचं कौतुक खास शब्दामध्ये केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नीरजच्या कुटुंबियांशी संवाद साधला. मुख्यमंत्री कौतुक करताना म्हणाले की, मराठे गोष्टी सांगत नाहीत तर, ते इतिहास रचतात. उद्धव ठाकरे नीरजचा भव्य सत्कार करणार आहेत.

जेव्हा नीरज मुंबईमध्ये येईल तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं. नीरज चोप्रा येत्या 13 तारखेला आपल्या हरियाणातील खांदरा या गावी येणार आहे. त्यावेळी त्याचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.

नीरज 15 ऑगस्टच्या स्वातंञ्य दिनाच्या कार्यक्रमाला दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर त्याचा भव्य सत्कार महाराष्ट्र सरकार करणार असल्याचाी माहिती नीरजच्या वडिलांनी माध्यमांसोबत बोलताना दिली.

दरम्यान, नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. महिंद्रा समुहाने त्याला नविन कार XUV 700 दिली आहे. त्यासोबत इंडिगो एअरलाईन्सने त्याला एक वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. गुरूग्राममधील इलान ग्रुपने नीरज चोप्राला 25 लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

“सिद्धार्थ माझा प्रियकर नाही पण तो सतत आजूबाजूला हवासा वाटतो”

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने संशय आलेल्या महिलेसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

हिंदू सणांवर निर्बंध लावून सणांचं महत्व कमी करण्याचा ठाकरे सरकारचा डाव- नितेश राणे

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More