“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ते आता आमच्यावरच फुत्कारतंय”
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष डीनरसाठी एकत्र दिसले. तिन्ही पक्षाचे मंत्री, आमदार यांच्यासाठी आयोजित या स्नेह भोजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहपत्नीक हजेरी लावली.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यात अनेक घडामोडी सुरू आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवरून चांगलंच राजकारण रंगत आहे. तर ठाकरे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली तरी हे सरकार पडणार असल्याचं भाकीत भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानंतर भाजपवर सडकून टीका केली आहे.
सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं. ते पिल्लू वळवळ करत होतं. आता आमच्यावरच फुत्कारत आहे, अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. सध्या देशात एक विकृती आहे. घृणास्पद राजकारण सुरू आहे. विकृतीपेक्षा घाणेरडेपणा आहे, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही? तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यावर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
“माझे अनेक बाॅयफ्रेंड झाले पण….”; अभिनेत्री तब्बूचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका, म्हणाले….
मोठी बातमी! राज्याच्या अनलाॅकविषयी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम
थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांसाठी मोठी योजना, ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले….
Comments are closed.