मुंबई | राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
महाराष्ट्रातून खासकरून मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर पैसेच उरणार नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हणलं जातं तेही म्हणलं जाणार नाही, असं मोठं वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रात वादळ उठलं आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. कोश्यारींना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, राज्यापालांच्या ओठांवरील वक्तव्य कोणाच्या पोटातून आलं आहे?, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावरून केंद्राचा मुंबईतील पैशांवर डोळा असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे. रक्त सांडून मुंबई मिळवली आहे, कोश्यारींच्या आंदणात आलेली नाही, असा घणाघात देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राज्यपाल कोश्यारींनी राजीनामा द्यावा’, संजय राऊत संतापले
बाळासाहेबांचे दुसरे नातू शिंदे गटात सामील, उद्धव ठाकरेंना मोठा झटका
तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख
“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”
‘मला केंद्राची सुरक्षा आहे त्यामुळे…’; ‘त्या’ पत्रावर नवनीत राणांची प्रतिक्रिया
Comments are closed.