‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक
मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना यांच्यात आता शाब्दिक आणि कायदेशीर लढाई सुरु आहे. शिवसेनेत बंड करुन त्यांनी शिवसेनेला अभूतपूर्व असे खिंडार पाडले. शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. त्यात ते बंडखोरांना आव्हाने देत सडकून टीका करत आहेत. तसेच काल (दि. 24) रोजी पक्षाच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही एकनाथ शिंदे आणि गटावर आगपाखड केली आहे.
उद्धव ठाकरे काल फारच आक्रमक पाहायला मिळाले. टीका करताना ते म्हणाले, भाजपला शिवसेना संपवायची आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या लोकांचा वापर करीत आहेत. बंडखोर लोकांनी शिवसेना पळविली, आता माझे वडील पण पळवत आहेत. ही कसली मुर्दुमकी? ही कसली बंडखोरी? ही बंडखोरी नाहीतर हरामखोरी आहे. हे सगळे दरोडेखोर आहेत.
तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या वडीलांचा फोटो लावू नका, सुदैवाने तुमचे आई वडील जीवंत आहेत, त्यांचे फोटो लावून मते मागा. शिवसेना फोडण्याचा अनेकांनी अनेकदा प्रयत्न केला. पण आताचे बंड हे शिवसेना संपविण्यासाठी आहे. ही बंडखोरी नाही तर हा हरामीपणा आहे. तुमच्यात हिंंमत असेल तर, राजीनामे द्या आणि निवडणुकींना सामोरे जा, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी बंडखोरांनी विनंती केली. आम्ही त्यांना म्हणतो, आम्ही तुम्हाला नाही म्हणत. तुम्हीच तुमच्या हाताने तुमच्या कपाळावर शिक्का मारून घेतला आहे. तोच आम्ही बोलतोय, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड
सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Comments are closed.