2000 साली बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?; उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल

मुंबई | दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. 2000 साली तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्र धगधगता ठेवला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांवर खटला का दाखल केला होता, असा सवाल करत ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

1992-93 ला बाबरी मशीद अयोध्येत पडली, पण बाळासाहेबांवर खटला येथे मुंबईत दाखल करण्यात आला. त्यावेळी शरद पवार सत्तेत होते. मग त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांना केला आहे.

बाबरी मशीद पडली अयोध्येत, मात्र दंगल घडली मुंबईत. त्यावेळी राज्यातील जनतेचा मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला. त्यावेळी शिवसेनाच जनतेला वाचवण्यासाठी पुढे आली. मात्र, सरकारने सामनातील जुना अग्रलेख शोधून काढत शिवसेनाप्रमुखांवर गुन्हा दाखल केला, असंही ठाकरे म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत आम्ही सुडाचे राजकारण करत आहोत, असा आमच्यावर आरोप होत आहे. पण सुडाचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-