“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”

Uddhav Thackeray | शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत भाजपवर अत्यंत कडू भाषेत टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघात केला. ‘मोदीजी तुम्हाला कल्पना नसेल. पण, स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरीही काही पावटे, पावटेचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात.’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

तेलंगणामधील भाषणात नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटलं होतं. या टिकेवरून उद्धव ठाकरे चांगलेच भडकले  आहेत. त्यांनी भाजपासह मोदींचा समाचार घेतला आहे. मला नकली संतान म्हणणारे, तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर राग काढला.

“मला नकली संतान म्हणणारे, तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाही”

“हिंदुहृदय सम्राटांचा मी पुत्र, तेलंगणाची निवडणूक आणि तेलंगणाच्या भाषणात हे मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी माझं बर्थ सर्टिफिकेट मागितलं? आणि तेवढी तुमची लायकीपण नाही. तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बाप नाहीत. तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत.”, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, चोराच्या हातात धनुष्यबाण दिलं, पण मशाल बघा कशी पेटलेली आहे. त्यांना प्रश्न असा पडलाय, संपूर्ण फौज मोदींच्या बाजूने आहे, भाजपची तीनपाटापासूनची मोठी भांडीकुंडी वाजणारी त्यांच्याकडे आहेत, पण तरीही ते उद्धव ठाकरेला घाबरतात, कारण जनतेच्या रुपाने माझ्याभोवती शिवसेनाप्रमुख आणि माझ्या माँ साहेबांचं आशीर्वादाचं कवच आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

“मोदींची जिरेटोपचं दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही”

पुढे त्यांनी भाजपावर अत्यंत जहरी टीका केली. “राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून त्यांना सगळी नकली संताने म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवर घ्यावे लागले. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री किती किंमतीचा असेल, हे सर्व नकली संताने आहेत. कारण तुम्हाला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून त्यांनी आणखी एक नकली संतान मांडीवर घेतलं. ते तर फारच वाह्यात निघालं.”, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

प्रफुल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातला होता. यावरूनही ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि मोदी यांच्यावर टीका केली. “प्रफुल पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यावर माझ्या महाराजांचा जिरेटोप ठेऊ नका. मोदींची माझ्या महाराजांसोबत बरोबरी करायची पात्रता काय?,जिथे माझे छत्रपती शिवाजी महाराज महिलेवर कुणी अत्याचार केला त्याचा शिरच्छेद करायचे. त्यामुळे महाराजांच्या जिरेटोपाला हात काय, तुमची जिरेटोपचं दर्शन घेण्याची सुद्धा पात्रता नाही.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रफुल पटेल आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

News Title –  Uddhav Thackeray criticizes Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा

ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार