बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…पण मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही- उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग | मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसं आम्ही त्यांना कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असं उद्वव ठाकरे म्हणाले. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणं गरजेचं आहे. समुद्राजवळ जमिनीखालून विजेच्या वायरी टाकणं, वादळाच्या पार्श्वूभूमीवर अनेकांचं स्थलांतर करावं लागतं. अशा लोकांना कायमस्वरुपी निवारा देणं आदी गोष्टी करण्यात येणार आहे. हा कायमस्वरुपी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनानं खासदाराचं कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांच्या अकराव्या-बाराव्याला दोन्ही मुलांचाही मृत्यू

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होताच मदतीची घोषणा करणार- उद्धव ठाकरे

‘हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय’; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More