बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत”

मुंबई | भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून नारायण राणे आणि नितेश राणे सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झालाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात काहीजणांना माणसांची इंजेक्शन्स लागू पडत नाहीत. त्यांना गुराढोरांची इंजेक्शन्स लागतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे”

“भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या- उद्धव ठाकरे

कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, कारण…- संजय राऊत

“छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More