Top News

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

मुंबई | अनेक दिवसांपासून सत्ता पाडण्याचं ऐकत आहे. हिंमत असेल तर सरकार पाडा, आम्ही तुमच्या सारखे गुळाच्या ढेपेला चिटकलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.

अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत., असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले”

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस…- अमृता फडणवीस

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या