बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे हॅलिकॉप्टरने तळीये गावात दाखल

रायगड | गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने रौद्ररुप धारण केलं आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी पूरामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळल्यानं प्रचंड जिवीत आणि वित्तहाणी झाली आहे. दरड कोसळल्यानं सर्वात मोठी दुर्घटना ही तळीये गावात घडली आहे. तळीये गावाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे मुंबईवरुन महाडपर्यंत हॅलिकॉप्टरने पोहोचले. महाडपासून तळीये गावापर्यंत ते रस्त्याने दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी गावात पोहोचून दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, तळीयेमध्ये ढिगारा कोसळल्यानं संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली दबलं गेलं आहे. ढिगाऱ्याखालून आत्तापर्यंत 40 जणांचा मृतदेह काढण्यात आला आहे. तसेच आणखी 70 ते 80 जण दबल्याचा अंदाज आहे.

स्थानिक प्रशासनासह बऱ्याच रेस्क्यू टीम तळीयेमध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या रेस्क्यू ऑपरेशन खूप वेगानं चालू आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकारने देखील या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तसेच जखमी झालेल्या लोकांना मदत जाहीर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच; हिरकणीवाडीत दरड कोसळली

पाॅर्न सर्चिंगमध्ये टाॅप नंबरवर आहे ‘हा’ जिल्हा अन् नंतर…

“राजने तयार केलेले व्हिडीओ पॉर्न नाहीत, यापेक्षा जास्त व्हिडीओ तर…” शिल्पाचं धक्कादायक उत्तर

“इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल”

मृत म्होरक्याचा वाढदिवस अन् रावण टोळीचा प्लॅन, पोलिसांनी दाखवला इंगा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More