उद्धव ठाकरेंनी 5 नेत्यांची केली हकालपट्टी; ‘या’ नेत्यांचा समावेश

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray l विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांना थेट निलंबित केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाला हा एकप्रकारे धक्काच बसला आहे.

ठाकरेंच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिवसेना उद्धव बाळासाहेबी ठाकरे गटाने विश्वास नांदेकर, माजी आमदार रुपेश म्हात्रे, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. यावेळी त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही थेट कारवाई केली आहे. मात्र ठाकरेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे पक्ष संपर्क प्रमुख असलेल्या रुपेश म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray l ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यांवर कारवाई :

माजी आमदार रुपेश म्हात्रे
यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा
चंद्रकांत घुगूल – झरी तालुकाप्रमुख
संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख
प्रसाद ठाकरे – वणी तालुकाप्रमुख

दरम्यान, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी या मतदारसंघात बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला आहे. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर सुद्धा पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

News Title : Uddhav Thackeray Expulsion 5 Shivsena Leaders

महत्वाच्या बातम्या –

राज्यात कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले? पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर

गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

मोदी-शाहंची तळी राज ठाकरे उचलतायेत; ‘या’ नेत्याची टीका

सलमान खानचं टेन्शन वाढलं; जिवंत रहायचं असेल तर…

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .