बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले

मुंबई | नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे.

काल मी नवनी सरकारचं अभिनंदन केलं. भाजपने तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. मी अडिच वर्ष हेच सांगत होतो. माझ्यासमोर 3 प्रश्न आहेत. अडिच वर्षांपूर्वी मी हेच सांगितलं होतं, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसैनिकांना बाजूला सारून असा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे, म्हणालेत.

माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”

मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मोठी बातमी! शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More