‘दया कुछ तो गड़बड़ है’; उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

Uddhav thackeray

Uddhav thackeray l विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीच सरकार स्थापन झालं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. अशातच आता नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील नागपुर येथे गेले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र आता त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट :

दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत.

मात्र आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई हे देखील उपस्थित होते. तसेच या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav thackeray l उद्धव ठाकरे काय म्हणाले? :

“महाराष्ट्रात सुस्कृंत राजकारणाची फार अपेक्षा आहे. तसेच यावेळी महायुतीच सरकार स्थापन झालेलं आहे. मात्र दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. परंतु महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते कसे जिंकले हे आता अनाकलनीय आहे. आम्ही जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न नक्कीच मांडू. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासंदर्भात होती हे तुम्हाला लवकरच कळेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

News Title – Uddhav thackeray first reaction after meet devendra fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला सोनिया गांधी मुख्यमंत्री करणार होत्या’; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!

मी लहान खेळणं वाटतो का? भुजबळांनी मनातली सगळीचं खदखद बाहेर काढली

सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

“माझं मंत्रिपद कोणी नाकारलं”, छगन भुजबळ कडाडले

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .