‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान
मुंबई | विधानसभेत दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. त्यात पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली. त्यात भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मते मिळवून विजयी झाले. तर दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक प्रस्ताव आणि विधानसभा विरोधीपक्षनेत्यांची निवडणूक पार पडली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणे केली आणि शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
भाजपकडून शिवसेना संपविण्याचा डाव सुरु आहे. असे खेळ करत बसण्यापेक्षा आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ. आपले काही चुकले असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल आणि ते चुकत असतील तर त्यांना घरी बसवेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, हिंमत असेल तर मध्यावती निवडणूका घेऊन दाखवा, असे आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिलं आहे.
शिवसेना भवनात आयोजित जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. राज्यभरातील जिल्हाप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. लढायचे असेल तर सोबत रहा, असे परखड आव्हानही त्यांनी जिल्हाप्रमुखांना केले. सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी यावेळी भाष्य केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवली जात असून हा घटनेचा अपमान आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, सध्या राज्यात जे सुरु आहे ते घटनेला धरुन आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेली घटना मोडण्याचा प्रकार सुुरु आहे, हे घटनातज्ञांनी सांगावे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय
‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
बिलाची काळजी करू नका, बिंधास्त हॉटेलमध्ये जेवा; वाचा सविस्तर
पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘मी कोणालाही घाबरत नाही…’, कालीच्या पोस्टर वादानंतर लिना मनिमेकलाईंचं स्पष्टीकरण
Comments are closed.