‘आज लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण…’; उद्धव ठाकरेंचा जनतेला पुन्हा इशारा
मुंबई | कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपण त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केलं.
पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी लाॉकडाउनचे संकेत दिले आहेत. तसेच मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
येत्या दोन तीन दिवसात मी पुन्हा बोलेन. मी तज्ज्ञांशी बोलेन, मला पर्याय सांगा, लॉकडाऊन पर्याय नाही मान्य, मग करायचं काय जरुर सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोग्य सुविधा सुधारणं म्हणजे फर्निचर उभं करणं नाही, तज्त्ज्ञ डॉक्टर हवेत. लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
अन् चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ
“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”
आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता
कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी
नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ
Comments are closed.