महाराष्ट्र मुंबई

योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना संकटावर मात करुन महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. नियम पाळून, योग्य काळजी घेऊन एकजुटीने कोरोनारुपी रावणाचा नाश करुया, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

लढवय्या महाराष्ट्र, अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले

कोरोनाच्या विषाणूला पराजीत करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम राबवत आहोत. घराघरापर्यंत पोहचून विषाणुचाच पाठलाग करुन, त्याला रोखण्याचा आपले कोरोना योद्धा प्रयत्न करत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

फडणवीससाहेब काळजी घ्या अन् कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हा- रोहित पवार

भाजप मंत्र्याने मतांसाठी काँग्रेस कार्यकर्त्याच्या पायावर ठेवलं डोकं; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रत्येकाला मोफत लस मिळावी, सर्व देशवासियांचा तो अधिकार आहे- अरविंद केजरीवाल

“विश्व हिंदू परिषदेने धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या