मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर अय़ोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना नेता संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच ऐतिहासिक सोहळ्यात सामील व्हा, असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याचप्रमाणे शरयू नदीतीरावर आरती करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंसह हजारो शिवसैनिकही अयोध्येत जाणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
चलो अयोध्या ..
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 22, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….
मालिकेतील कोणताच भाग वगळणार नाही; अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण
महत्वाच्या बातम्या-
“तृप्ती देसाई, तुला कापून टाकीन…”
“मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो”
‘त्या’ व्हायरल व्हीडिओबाबत नवाब मलिकांचं स्पष्टीकरण; म्हणतात…
Comments are closed.