लखनऊ | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांची अयोध्यावारी गाजण्याची शक्यता असतानाच उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’चा मान मिळणार आहे.
उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवू असं म्हणत महंत परमहंस दास यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे तर त्याच वेळी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने ठाकरेंना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना खासदार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तसेच उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या काळात तिसऱ्यांदा अयोध्यावारी करत आहेत. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा अयोध्येला गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यापासून शिवसेनेवर हिंदूत्व सोडल्याची टीका होत होती. या पार्श्वभूमीवर त्यांचा अयोध्या दौरा महत्वाचा मानला जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आम्ही सरड्यासारखे रंग बदलत नाही”
निर्भयाच्या आरोपींना भरचौकात फाशी देण्यात यावी- अमृता फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा पाहा 111 सेकंदात; पाहा व्हिडीओ
YES बॅंकेवर निर्बंध येण्याआधी गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी!
सध्या देशात सुरु असलेला हिंसाचार पाहून दु:ख वाटतं- गुलजार
Comments are closed.