नितेश राणेंना हसू आवरेना; व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल जाहीर केलाय. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे. 

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपल्याला किती आनंद झाला हे सांगण्यासाठी त्यांच्या हसण्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून नितेश राणे उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जातोय. या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिलेला निर्णय हा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय घातक निर्णय आहे, असं ते म्हणालेत.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही. 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून आणि बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे, असंही ते म्हणालेत.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी मधल्या काळातील आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाचा आणि निकाल कोणाच्या बरोबर आहे? हे जर का केवळ आणि केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवरती ठरवायला लागलो तर मग मात्र कोणी धनाड्य माणूस निवडून आलेला आमदार-खासदार विकत घेऊन पक्षाचा सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .