Top News

सरकारचा मोठा निर्णय; शाळेत परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन होणार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसेच  परिपाठातले इतर विषय वगळण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची तत्वे रुजवण्याची गरज आहे. त्यासाठीच सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये दररोज परिपाठ घेतला जातो. या परिपाठातले विषय शाळा ठरवत असते. आता 26 जानेवारीपासून शाळेच्या परिपाठाच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात येणार आहे. संविधानातील स्वातंत्र, समता आणि बंधुता या मुल्यांची रुजवण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच सांगण्यात आलंय.

दरम्यान, 2013 सालीच शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 2014 साली भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ठाकरे सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसेने ट्वीट केलेल्या व्हिडिओतून ‘स्वराज्याची झलक’; दिले बदलाचे संकेत

‘त्या’ व्हिडीओशी आमचा कुठलाही संबंध नाही; भाजपचे स्पष्टीकरण

गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये; संभाजीराजे संतापले

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या