Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने विजयी कौल दिला. तर, महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. मविआला तिन्ही पक्ष मिळून 50 च्याही वर जागा मिळाल्या नाही. तर, महायुतीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी मोठी कामगिरी केली. एकट्या भाजपानेच 132 जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या विजयानंतर मविआमधील अनेक नेत्यांच्या महायुतीकडे भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
अशात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shiv Sena UBT) एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाची तयारी केल्याचं बोललं जातंय. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
ठाकरेंचा नेता गिरीश महाजन यांच्या भेटीला
इतकंच नाही तर, शुभेच्छा देतानाच ठाकरेंच्या या नेत्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची देखील इच्छा बोलून दाखवली असल्याचं समजतंय. विधानसभेतील विजयामुळे राज्यात आता पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार असल्याने महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
त्यामुळेच ‘मविआ’तील नेत्यांसह काही पदाधिकाऱ्यांनी आता महायुतीशी जवळीक साधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभेनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्येही विधानसभा निवडणुकीसारखेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे मविआतील नेते महायुतीशी संपर्क साधत आहेत.
विधानसभेत मविआला किती जागा मिळाल्या?
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने 81 जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी 57 जागा शिंदे गटाने जिंकल्या. तर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 20 जागांवर विजय मिळवता आला. तर, अजित पवार गटाने 59 जागा लढल्या यापैकी 41 जागांवर अजित पवार गटाचा विजय झाला. तसेच 16 जागांवर काँग्रेस विजयी झाली. यात भाजपाने सर्वाधिक 132 जागा मिळवल्या.
News Title – Uddhav Thackeray group leader may join BJP
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर
उद्धव ठाकरे अॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?
बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!
‘कोणत्या दुनियेत आहात धनूभाऊ?, काही सिरीयसनेस…’, सरपंच हत्येवर आमदार धस संतापले