बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा दिसते, अशी स्तुतीसुमने साध्वी कांचन गिरी यांनी उधळली आहेत. तसेच राज ठाकरेंचे कौतुक करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं आहे, असं कांचन गिरींनी म्हटलं आहे.

कांचन गिरी या सध्या मुंबईत आलेल्या आहेत. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल मला काही बोलायचं नाही. त्यांनी वडिलांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलत होते, ते करून दाखवायचे. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. तसेच बाळासाहेब हिंदूंसाठी डरकाळी फोडायचे, असं कांचन गिरी म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिम लोकांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असं सांगतानाच गिरी यांनी पालघर जिल्ह्यातील हत्याकांड होत असताना, उद्धव ठाकरेंनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, अशी टीका गिरी यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, कांचन गिरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. गिरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तासभर खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरेंनी हिंदू राष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही गिरी यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना लस न घेण्याचा निर्णय आला ‘या’ अभिनेत्रीच्या अंगलट, वाचा सविस्तर

‘या’ कारणामुळे भारतीय हवाई हद्दीत घुसलं शेजारील देशाचं विमान

महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याने रचला इतिहास, केलं 100 टक्के लसीकरण पुर्ण

“प्रेयसीनं दगा दिला म्हणजे प्रियकराला…”; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

साखर कारखान्याच्या निवडणुकीत एका मतासाठी 3 हजार मोजले, पार्ट्या केल्या अन्…; शिवसेना आमदाराची कबुली

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More