बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरेंनी सरनाईकांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे’; संजय राऊतांचं सूचक विधान

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येत सत्तेच्या पायऱ्या चढणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रताप सरनाईकांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मनी लाँड्रींग प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरनाईक यांच्याबद्दल निर्णय घेतला असून लवकरच बातमी कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान, 10 जून रोजी सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल.

तसेच सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असलेला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी पत्रात केल्याचं समोर आलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More