Top News औरंगाबाद महाराष्ट्र

“केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही, काम पूर्ण करायला आलोय”

औरंगाबाद | औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण करायचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

निवडणूक झाल्या आहेत म्हणून मी विकासकामे करायला आलो आहे असं नाही. कोरोनामुळे कामे रखडली होतीत. मला ही विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

औरंगाबाद शहराने खूप काही दिलं. आता मला काम करण्याची घाई लागली आहे. या शहराचा मला वेगाने विकास करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली म्हणजे झालं असं नसल्याचं उद्धव ठकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, संभाजीनगर येथे 1680 कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क, शहरातील 152 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली.

 

थोडक्यात बातम्या-

…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार

‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

शरद पवारांकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो त्यांच्याकडे नेहमी…- अमृता फडणवीस

“कुणीही कोणासोबत गेलं तरी मुंबई महापालिका शिवसेनेकडेच राहणार”

‘देवेंद्र.. जीवनात मोठं व्हायचं असेल तर…’; फडणवीसांनी सांगितला मुंडेंनी दिलेला कानमंत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या