बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

मुंबई | राम मंदिराच्या जमीन खरेदी घोटाळ्यावरून राज्यातील भाजप-शिवसेनेमध्ये खडाजंगी चालू आहे. मुंबईत आज शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपवरून शिवसेनेनं भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजप संतापली आहे. त्यानंतर आता या दोन्ही पक्षात वाकयुद्धाला सुरवात झाली आहे.

जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचे उद्धव ठाकरे आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आले आहेत. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?, अशी खोचक टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. तर मानलं मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

येत्या मुंबई महापालिकेची मैदानी रंगीत तालिम बुधवारी सर्वांना पाहायला मिळली. येत्या निवडणूकीत सेना विरूद्ध भाजप असाच सामना पाहायला मिळू शकतो. सेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भांडणानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भाजपच्या 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. तर मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तास वेगळी चर्चा झाली होती.

थोडक्यात बातम्या-

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More