उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायची घाई केली नाहीतर…,छगन भुजबळांचा मोठा दावा

मुंबई | शिंदेनी(Eknath Shinde) बंड केलं तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना गुवाहाटीला नेले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि सरकारी बंगला सोडला होता.

पण आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायची घाई केली नाहीतर आज काही प्रश्न वेगळ्या मार्गावर असते. पण जर तरला अर्थ नसतो, असंही भुजबळ म्हणाले.

सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं आहे. त्यांना जनतेचा पाठींबा मिळेल, असंही भुजबळ यावेळी म्हणाले. ते नाशिक येथे पत्रकरा परिषदेत बोलत होते.

दरम्यान, भुजबळ यांनी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत या सत्तासंघर्षावर निर्णय लागणे अपेक्षित आहे, असं भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-