विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन!

Uddhav Thackeray | नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा मिळवल्या आहेत. तर महायुतीने केवळ 17 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच याचा परिणाम हा येत्या विधानसभेत दिसून येणार आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप आता राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे. तर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील महाराष्ट्र दौरे करणार असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात बैठक

याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना भवनामध्ये बैठक घेतली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार, आमदार यांची बैठक घेण्यात आली होती. ठाकरे गटाचा कोणत्या मतदारसंघात पराभव झाला त्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. तसेच ज्या मतदारसंघात विजय झाला तिथे जाऊन लक्ष देण्याबाबत आवाहन केलं आहे.

अशातच राज्यात काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या चूका झाल्या होत्या. त्या पुन्हा एकदा होऊ नये याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात उशीरा उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच काही मतदारसंघात योग्य पद्धतीने तिढा न सुटल्याने उमेदवाराचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

उद्धव ठाकरेंकडून सूचना

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जागा वाटवापची चिंता करून का, राज्यात महाविकास आघाडी कशी मजबूत होईल याचा विचार करा, अशा सूचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकीत दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांसमोर आपलं लक्ष मांडलं आहे. या विधानसभेसाठी एकूण 288 जागा आहेत. त्या जागांपैकी180 जागांवर महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र येणार आहेत. ते आता राज्याच्या प्रत्येक मतदारसंघात जात मतदारांना संबोधित करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

News Title – Uddhav Thackeray Important Order To Party Leaders About Maharashtra Assembly Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन!

दोन जिवलग मित्रांनी एकत्र संपवलं जीवन, थरकाप उडवणारी घटना आली समोर

पुणेकरांनो सावधान! पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

मुंबईत मान्सूनचं जोरदार आगमन, ‘या’ भागांना येलो अलर्ट

“स्तनांचा आकार वाढवण्यासाठी…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा