बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

औरंबागाद |  शेतकरी तुमचा आमचा अन्नदाता आहे. त्यांच्या जिवाशी खेळलात तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

शिवसेनेचा जन्म मुळात शेतकरी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी झाला आहे आणि ती अविरतपणे चालू राहिल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं.

पीकविमा योजनेत जो घोटाळा झाला आहे त्याचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसलाय त्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने पीक विमा मदत केंद्र सुरू केली आहेत, अशी माहिती उद्धव यांनी दिली.

औरंगाबादकरांचं शिवसेनेवरच प्रेम कमी झालंय काय? इथं भगवा मागे राहतोच कसा?? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

-अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर कोर्टाचा मोठा निर्णय

-“शिवसेना सत्तेत आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही”

-उद्धव ठाकरे म्हणतात… शेतकऱ्यांना नडाच तुमची दुकानंच बंद करून टाकतो

-खैरेंचा पराभव अजूनही उद्धव ठाकरेंना सतावतोय, म्हणतात औरंगाबादचं शिवसेनेवरचं प्रेम आटलं का??

-कठीण प्रसंगात आत्महत्या करू नका; कृषीमंत्र्यांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More