बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वप्नातही वाटलं नव्हतं मुख्यमंत्रिपदी विराजमान होईल- उद्धव ठाकरे

लखनऊ | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. तसेच अयोध्येत येणं हे माझं भाग्य असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री झालो. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मुख्यमंत्रिपदी विराजमान होईल. पण प्रभूरामाच्या कृपेने मी मुख्यमंत्री झालो. रामचं दर्शन घेतल्यानं नेहमीच उत्साह येत असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी यापूर्वीही अयोध्येला आलो आहे. पुढेही येत राहीन. मागीव वेळे प्रमाणे शरयु किनारी आरती करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी यावेळी आरती शक्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अयोध्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचं उत्तर प्रदेश सरकारनं जोरदार स्वागत केलं. तसे उत्तर प्रदेश सरकाने उद्धव ठाकरे यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा पाहा 111 सेकंदात; पाहा व्हिडीओ

YES बॅंकेवर निर्बंध येण्याआधी गुजरातच्या कंपनीनं काढले 265 कोटी!

महत्वाच्या बातम्या-

…अन् तिच्या ‘त्या’ वक्तव्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही कोसळलं रडू!

“आमची छाती फाडली तरी रामच दिसतील; आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही”

“नारायण राणे हे भाजपचे बकरे बनले आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More