बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर कारवाई करत नाही”

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यापासून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे राजीनामा घेत नसल्याचं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांना अटक झाली तेव्हाच आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांचा राजीनामा तात्काळ घ्यायला हवा होता. मात्र राष्ट्रवादी पाठींबा काढून घेईल या भीतीनं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही. केवळ सत्ता जाण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरे कारवाई करत नाहीत, असा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपकडून सूडनाट्याने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. हा आरोपच चुकीचा आणि निराधार आहे, असंही दरेकरांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! दोन वेळच्या अन्नासाठी ‘या’ ठिकाणी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ

युक्रेनच्या रस्त्यावर महाकाय रशियन फौज, धक्कादायक फोटो समोर

Petrol Diesel Price : महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधन दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

युक्रेनमधून 182 विद्यार्थी मुंबईत, नारायण राणेंनी विमानतळावर केलं स्वागत

डायबिटीज पेशंट असाल तर ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश, शुगर राहिल कंट्रोलमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More