बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

मुंबई | 2019 ला महाराष्ट्रात शिवसेनेच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सत्तांतर झालं. उद्धव ठाकरे यांच्या धाडसी निर्णयाने शिवसेना आणि भाजप यांची खूप जुनी मैत्री संपुष्टात आली. प्रशासन चालवण्याचा कसलाही अनुभव नसताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक सर्व स्तरातून होताना दिसत आहे.

सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे आपल्या बेधडक वक्तव्यासांठी प्रसिद्ध आहेत. जावेद अख्तर हे सतत आपल्या वक्तव्यांनी राजकारणात पण चर्चेत असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन या मुख्यमंत्र्यांइतकेच लोकप्रिय आहेत, असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंचे कठोर टीकाकार सुद्धा त्यांच्याबद्दल मनात कटूता ठेवणार नाहीत. उद्धव ठाकरे अन्याय करत असल्यांचा आरोप त्यांचे विरोधक सुद्धा करणार नाहीत. या शब्दात जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. जावेद अख्तर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

ठाकरे सरकारची तुलना तालिबान सोबत करणाऱ्यांना अख्तर यांनी चांगलंच फटकारलं आहे. उद्धव ठाकरे हे तीन पक्षांचं सरकार असुन अतिशय उत्तम प्रकारे राज्याचा कारभार चालवत आहेत. त्यांना कुणी तालिबानी कसं म्हणू शकतं, असंही जावेद अख्तर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“Work From Home बंद करा नाहीतर आमचा संसार मोडेल”

…तर तुम्ही केंद्र सरकारलाही देशद्रोही म्हणणार का?- रघुराम राजन

पुण्यातील प्रसिद्ध ‘मराठे ज्वेलर्स’च्या कौस्तुभ मराठेंना अटक

“काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली 113 एकर जमिन मोकळी केली”

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More