बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, ते आमच्या मागण्या नक्की पुर्ण करतील”

कोल्हापूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली. पाऊस थांबला असला तरी पुराचं पाणी कमी झालं नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्या स्थितीत मुख्यमंत्र्यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंगवाडी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धौर्यशील माने आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांचं विमानतळावर स्वागत केलं. खुद्द मुख्यमंत्री आपल्या गावात येत असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिक मागून आवाज देत होते. त्यानंतर मुख्यमंत्री आवाज देणाऱ्या नागरिकांजवळ गेले आणि त्यांच्या व्यथा ऐकल्या. त्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री हे बाळासाहेबांचे वंशज आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहे. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले. आमचं त्यांनी ऐकून घेतलं. आमच्या मागण्या मुख्यमंत्री नक्की पुर्ण करतील, असा माझा पुर्ण विश्वास आहे, असं कोल्हापूरातील स्थानिक नागरिकांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून योग्य ती मदत करावी. सरकारने जाहिर केलेली 10 हजारांची मदत वाढवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, शिरोळ गाव गेल्या आठवडाभर पाण्यात आहे. सांगलीतील पाणी जत तालुक्यात वळवलं तर वर्षभर गावात महापूर येणार नाही. यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर….”

पुणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून सुरु होऊ शकते मेट्रो

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More