Top News राजकारण

“उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही”

मुंबई | भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील या संजय राऊतांच्या भाकितावरून निलेश राणेंनी चिमटा काढलाय.

उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही, असं निलेश राणे म्हणालेत. यासंदर्भात निलेश राणेंनी ट्विट केलंय.

निलेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. सध्या ते एक शहर सांभाळू शकत नाहीयेत. हे सरकार कुबड्यांवर चालतंय.”

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं करेल,” असा घणाघाती टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीये.

थोडक्यात बातम्या-

‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचंय त्यामुळे…’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

‘मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर…’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा!

“ज्यांच्या राजकारणाचं दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभं आहे त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या