बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी जोडले केंद्र सरकारसमोर हात; केलं ‘हे’ आवाहन

मुंबई | मराठा समाजाच्या गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारने राष्ट्रपतींना आहे असं नमूद केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आरक्षणावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी हात जोडून विनंती केली आहे.

“आरक्षण देण्याचा निर्णय राजकारण असून केंद्र सरकारने राष्ट्रपतींना आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या अशी मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणामुळे मराठा समाजाचा रोष पत्करावा लागू नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतील आणि दोषारोप करतील हे मात्र नक्की.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत. मराठे रस्त्यावर उतरतील, असा इशारा शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिला आहे. मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस आहे, असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, अशी राज्य सरकारने केलेली दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यासंबंधी न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयातर्फे रद्द करण्यात आल्याचा मोठा निर्णय आज दिला आहे. तसेच 50 टक्क्यांच्यावर दिलं गेलेलं मराठा आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान आज स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या –

पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

पोलिसांना माणुसकी आली अंगलट; रोजा सोडण्यासाठी आरोपीला सोडलं अन्…

“या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीने खून केला”

“मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत”

“पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी, कोरोना लढ्याची जबाबदारी गडकरींकडे सोपवा”    

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More