‘देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार…’; कार्यकर्त्यांच्या घोषणावर उद्धव ठाकरे हसले

मुंबई | पंतप्रधानपदासाठी खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव चर्चेत आणलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी एका उत्साही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणा दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही काहीही हरकत नसल्याचं म्हणत महाविकासआघाडीच्या नेत्यांना एक सल्ला दिला.

घोषणा ऐकून उद्धव ठाकरे हसले, तसंच ‘काही हरकत नाही, पण त्याच्यासाठी पहिले एकत्रित लढा. नाहीतर परत तेच, तुझं माझं तुझं माझं. तंगड्यात तंगड्या घालायला लागलो, तर आपण इकडेच राहू आणि घोषणा देणारेही इकडेच राहतील, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More