Top News

“योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली”

नवी दिल्ली |  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले होते. योगींना मुंबईच्या मायानगरीमध्ये त्यांना उत्तर प्रदेशमध्ये अतिसुंदर मायानगरी तयार करायची आहे. योगी मनाने साधू महाराज आहेत, असं संपुर्ण वर्णन करत उत्तर प्रदेशचे वास्तव आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस. एन. सिंह यांनी मुख्यमंत्री आणि सामनाच्या अग्रलेखावर निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ मुंबईत आल्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याचं दिसत असल्याचं त्यामुळे त्यांनी सामनाच्या संपादकीयमधून चुकीची भाषा वापरली, असं एस. एन. सिंह यांनी  म्हटलं आहे.

संपादकीय लेखामध्ये त्यांनी वापरलेल्या भाषेचा आम्ही निषेध करतो. कदीचिच हीच त्यांच्या पक्षाची संस्कृती असेल. आम्ही खुल्या दिलाने बॉलिवूडच्या लोकांचं स्वागत करत असल्याचंही एस. एन. सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना दुसऱ्यांवर बोट दाखवू शकत नाही. त्याआधी त्यांनी बॉलिवूडसोबत असलेल्या परंपरेचा अभ्यास करावा, असंही सिंह यांनी म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे हरियाणाचे मनोहरलाल खट्टर यांचे सरकार अडचणीत

आता माघार नाही!; शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता ‘द ग्रेट खली’ही सहभागी

अपघातग्रस्त व्यक्तीला भाजप आमदार राम सातपुतेंचा मदतीचा हात!

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या