सर्वोच्च न्यायालयाकडे उद्धव ठाकरेंनी केली मोठी मागणी!
मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात पक्षासंदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. यामुळे शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
निवडणूक आयोगानं काय करावं आणि काय करू नये हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. मात्र आम्ही आयोगाला सूचित करत आहोत करत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला देखील लगावला. पैशांच्या बळावर मुख्यमंत्री होणं योग्य नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना ही एकच आहे. मी ती वेगळी मानत नाही. सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.